PM Kisan Yojana 22nd Installment Update: देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Yojana) २२वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील हप्ता नोव्हेंबरमध्ये मिळाल्यानंतर आता शेतकरी बांधव पुन्हा एकदा ₹2000 च्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे. आपल्याला हा हप्ता मिळणार की नाही?
शेतात राबणारा शेतकरी असो वा अल्पभूधारक, पीएम किसान योजनेच्या ₹2000 रुपयांवर अनेकांचे घरखर्च, बियाणे-खतांचा खर्च अवलंबून असतो. त्यामुळे हप्ता येणार की अडणार, हे वेळेत तपासणे फारच गरजेचे आहे.
पीएम किसान योजनेत किती पैसे मिळतात?
पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 आर्थिक मदत दिली जाते. हे पैसे तीन हप्त्यांत प्रत्येकी ₹2000 थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. आतापर्यंत योजनेचे २१ हप्ते यशस्वीरित्या वितरित झाले असून आता २२व्या हप्त्याची चर्चा सुरू आहे.
22वा हप्ता फेब्रुवारीतच का?
योजनेनुसार दर चार महिन्यांनी हप्ता दिला जातो. नोव्हेंबर २०२५ मध्ये २१वा हप्ता मिळाल्याने, पुढचा म्हणजेच २२वा हप्ता फेब्रुवारी २०२६ मध्ये येण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, e-KYC, जमीन कागदपत्रे किंवा बँक खात्याशी संबंधित त्रुटी असतील, तर पैसे अडकू शकतात. म्हणूनच वेळेत आपले नाव यादीत आहे का आणि स्टेट्स काय आहे हे तपासणे खूप महत्त्वाचे आहे.
PM Kisan Yojana Beneficiary List मध्ये नाव आहे का? असा करा चेक
जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही, तर खालील सोपी पद्धत वापरा
1. सर्वप्रथम pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा
2. होमपेजवर Beneficiary List या पर्यायावर क्लिक करा
3. त्यानंतर Report वर क्लिक करा
4. राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा
5. यानंतर तुमच्या गावाची लाभार्थी यादी स्क्रीनवर दिसेल
6. त्या यादीत तुमचे नाव आहे का ते तपासा
जर यादीत नाव दिसत नसेल, तर पुढचा हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते.
PM Kisan Yojana Status Check: पैसे येणार की नाही हे असे समजेल
फक्त यादीत नाव आहे की नाही एवढंच नाही, तर तुमचा हप्ता Hold वर आहे की Process मध्ये आहे हेही तपासता येते.
स्टेट्स चेक करण्याची पद्धत:
1. pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा
2. Know Your Status या पर्यायावर क्लिक करा
3. तुमचा Registration Number टाका
4. कॅप्चा कोड भरा
5. मोबाईलवर आलेला OTP टाका
6. यानंतर तुमचा संपूर्ण स्टेट्स स्क्रीनवर दिसेल
इथे तुम्हाला e-KYC पूर्ण आहे की नाही, बँक खाते लिंक आहे का आणि पुढचा हप्ता कधी येऊ शकतो याचीही माहिती मिळते.
आज अनेक शेतकऱ्यांचे पैसे फक्त छोट्या चुका जसं की e-KYC अपूर्ण, आधार-बँक लिंक नसणे किंवा चुकीची माहिती यामुळे अडकले आहेत. त्यामुळे वेळ वाया न घालवता आजच तुमचा PM Kisan Status तपासा. PM Kisan Yojana 22nd Installment Update
₹2000 ची मदत ही रक्कम लहान वाटत असली, तरी शेतकऱ्याच्या आयुष्यात ती मोठा आधार ठरते. योग्य वेळी माहिती घेतली, तर हक्काचा पैसा खात्यात येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तुमचा २२वा हप्ता येणार का? आजच स्टेट्स तपासा आणि इतर शेतकरी बांधवांनाही ही माहिती शेअर करा.