Namo Shetkari Yojana: राज्यात जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी सुरू असतानाच शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. महागाई, खतांचे दर, डिझेलचे भाव आणि पिकांवरचं संकट यामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधीच हा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो, अशी चर्चा सध्या गावागावात सुरू आहे. Namo Shetkari Yojana
राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून वर्षाला ६ हजार रुपयांची मदत दिली जाते. ही रक्कम तीन टप्प्यांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. सध्या या योजनेच्या पुढील हप्त्याकडे लाखो शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. उपलब्ध माहितीनुसार, हा हप्ता फेब्रुवारी महिन्यात जमा होण्याची शक्यता असून, निवडणुकीपूर्वीच शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळू शकतो.
दुसरीकडे, केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान निधी योजना देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरली आहे. या योजनेअंतर्गतही पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे २१ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून, २२वा हप्ता लवकरच वितरित केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. पीएम किसानचा शेवटचा हप्ता नोव्हेंबर महिन्यात मिळाल्यामुळे, चार महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असून फेब्रुवारीत पुढील हप्ता मिळण्याची शक्यता बळावली आहे. शेतकऱ्यांमध्ये सध्या सर्वात मोठी चर्चा ही दोन्ही योजनांचे हप्ते एकत्र मिळणार का, याबाबत आहे. पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे हप्ते साधारणपणे एकाच कालावधीत दिले जातात.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारण आठ दिवसांच्या आत राज्य सरकार नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करू शकते. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ४ हजार रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात जिल्हा परिषद निवडणुका ५ फेब्रुवारी रोजी होणार असल्याने, त्याआधीच नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येत्या दहा ते पंधरा दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले, तर निवडणुकीआधीच सरकारकडून मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचं चित्र दिसू शकतं.
सध्या राज्यात नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे सुमारे ९० ते ९४ लाख पात्र शेतकरी लाभार्थी आहेत. ई-केवायसी पूर्ण असलेले, बँक खाते आधारशी लिंक असलेले आणि इतर सर्व निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे अनेक शेतकरी सध्या बँक खाते, आधार लिंकिंग आणि ई-केवायसीची पुन्हा एकदा खात्री करून घेताना दिसत आहेत.
एकूणच पाहता, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकाच वेळी मिळाल्यास, तो मोठा दिलासा ठरणार आहे. शेतीच्या कामांसाठी, खत-बी-बियाण्यांसाठी आणि घरखर्चासाठी हा पैसा उपयोगी पडणार असल्याने, पुढील काही दिवस शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
हे पण वाचा : नमो शेतकरी योजना ८ वा हप्ता! शेतकऱ्यांच्या खात्यात ₹२००० या दिवशी जमा होणार