Mercury Transit in Aquarius 2026 : ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला बुद्धी, विचारशक्ती, संवाद, लेखन, व्यवसाय आणि निर्णयक्षमतेचा कारक मानले जाते. माणसाच्या बोलण्यातून ते व्यवहारापर्यंत सर्व गोष्टींवर बुधाचा प्रभाव असतो. त्यामुळे बुधाची चाल बदलली की अनेकांच्या आयुष्यात मोठे बदल घडताना दिसतात.
येत्या ३ फेब्रुवारी रोजी बुध ग्रह मकर राशीतून बाहेर पडत कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ ही राशी बदल, नवीन कल्पना, आधुनिक विचार आणि प्रगतीचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे हे संक्रमण अनेकांसाठी संधींचे नवे दरवाजे उघडणारे ठरणार आहे. काही राशींसाठी तर हा काळ सुवर्णसंधी घेऊन येणार असून, पैसा, करिअर आणि नातेसंबंधांमध्ये मोठी सुधारणा दिसून येईल. चला तर जाणून घेऊया, बुधाच्या या महत्त्वाच्या गोचरामुळे कोणत्या राशींचं नशिब फळफळणार आहे…
मेष राशी : रखडलेली कामं मार्गी लागणार
मेष राशीच्या लोकांसाठी बुधाचे हे संक्रमण दिलासादायक ठरणार आहे. बराच काळ अडकलेली कामे आता हळूहळू पूर्णत्वास जातील. नोकरी असो किंवा व्यवसाय, नवीन लोकांशी संपर्क वाढेल आणि त्याचा थेट फायदा होईल. योग्य नियोजन आणि स्पष्ट विचारामुळे घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील. विशेषतः नेटवर्किंग आणि ओळखी प्रगतीचा मार्ग मोकळा करतील.
मिथुन राशी : करिअरमध्ये वेग, शब्दांना मिळणार वजन
मिथुन राशीसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण बुध हा तुमचा स्वामी ग्रह आहे. ३ फेब्रुवारीनंतर करिअर आणि शिक्षणाशी संबंधित अडचणी दूर होतील. तुमचं बोलणं, विचार मांडण्याची पद्धत लोकांना प्रभावित करेल. मुलाखत, मीटिंग, करार किंवा व्यवसायिक चर्चा यामध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे. रखडलेली कामं पुन्हा गती घेतील आणि आत्मविश्वास वाढेल.
सिंह राशी : भागीदारीतून मिळणार मोठा फायदा
सिंह राशीच्या लोकांसाठी बुधाचं हे संक्रमण नातेसंबंध सुधारण्याचं काम करेल. वैयक्तिक किंवा व्यावसायिक मतभेद संवादातून मिटवता येतील. व्यवसायात नवीन करार, भागीदारी किंवा ऑफर मिळू शकते. सहकार्य वाढेल, कामाचं वातावरण सकारात्मक राहील आणि तुमचा आत्मविश्वास आणखी बळकट होईल. योग्य वेळी घेतलेले निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरतील.
तूळ राशी : सर्जनशीलतेतून कमाईचे नवे मार्ग
तूळ राशीसाठी बुधाचे कुंभ राशीतील संक्रमण सर्जनशील क्षेत्रात नवे वारे घेऊन येणार आहे. लेखन, मीडिया, डिझाइन, कला, डिजिटल किंवा सोशल मीडिया क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. नवीन कल्पनांमधून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात. नातेसंबंधांमध्ये मोकळा संवाद होईल आणि गैरसमज दूर होतील. Mercury Transit in Aquarius 2026
कुंभ राशी : बुध तुमच्याच राशीत, नशिबाची साथ पक्की
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ सर्वात खास ठरणार आहे, कारण बुध थेट तुमच्या राशीत भ्रमण करत आहे. आत्मविश्वासात लक्षणीय वाढ होईल. तुमचे विचार स्पष्टपणे मांडण्याची क्षमता वाढेल. करिअर, अभ्यास, व्यवसाय आणि संवादाशी संबंधित क्षेत्रात उत्कृष्ट परिणाम मिळू शकतात. या काळात घेतलेले निर्णय पुढील अनेक वर्षांसाठी लाभदायक ठरतील.
३ फेब्रुवारीपासून सुरू होणारे बुधाचे कुंभ राशीतील भ्रमण अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणार आहे. योग्य निर्णय, स्पष्ट संवाद आणि नवीन कल्पनांना साथ दिल्यास हा काळ तुमच्यासाठी आर्थिक स्थैर्य, करिअरमधील झेप आणि मानसिक समाधान घेऊन येऊ शकतो.
टीप : वरील माहिती ज्योतिषशास्त्रीय गणनांवर आधारित असून, प्रत्येकाच्या वैयक्तिक कुंडलीनुसार परिणाम वेगळे असू शकतात.